नाशिकला कांद्याचा भाव ५५०० क्विंटल
By Admin | Updated: August 18, 2015 00:39 IST2015-08-18T00:33:04+5:302015-08-18T00:39:12+5:30
नाशिकला कांद्याचा भाव ५५०० क्विंटल

नाशिकला कांद्याचा भाव ५५०० क्विंटल
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदश्चंद्र पवार बाजार समितीत सोमवारी (दि. १७) कांद्याला क्विंटलला ५५०० रुपये भाव मिळाल्याची माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली.
सोमवारी पेठरोड येथील शरदश्चंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा-बटाटे या मालाची नियमितपणे लिलाव पद्धतीने विक्री होत असतानाच कळवण तालुक्यातील बापेगाव येथील शेतकरी गोविंद चौरे या शेतकऱ्यास कांदा या शेतमालाच्या विक्रीस ५५०० रुपये इतका विक्रमी भाव क्विंटलला मिळाल्याचे सचिव अरुण काळे यांचे म्हणणे आहे. गेल्या दोन महिन्यांतील कांद्याला मिळालेला ५५०० रुपयाचा भाव हा उच्चांकचा भाव असल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे. यापुढेही कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे कांदा विक्रीसाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदश्चंद्र पवार उपबाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणण्याचे आवाहन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
आणखी वृत्त : पान २