कांद्याचे भाव गडगडले

By Admin | Updated: August 14, 2016 22:17 IST2016-08-14T22:07:29+5:302016-08-14T22:17:56+5:30

येवला : शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी, शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेच्या कार्यवाहीची प्रतीक्षा

Onion prices have collapsed | कांद्याचे भाव गडगडले

कांद्याचे भाव गडगडले

येवला : जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने बाजार समितीच्या मोकळ्या कांद्याचा लिलाव करण्याच्या निर्णयाच्या पाशर््वभूमीवर शनिवारी सकाळी येवला बाजार आवारात ६० ट्रक्टर व २२० रिक्षांमधून एक हजार क्विंटल कांदा विक्र ीसाठी दाखल झाला. व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव पुकारले. खुल्या पद्धतीच्या कांदा लिलावात ३०० ते ८१५ रु पये, तर सरासरी ५५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रि या व्यक्त केल्या.
प्रचंड दुष्काळीस्थिती असतानादेखील परिस्थितीवर मात करून पाणी असेल तेथे ठोका पद्धतीने मोठ्या कष्टाने कांदा पिकविला. परंतु अशा परिस्थितीत कांद्याला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा सहा महिने चाळीत साठवून ठेवला. परंतु ३०० ते ८०० रु पये भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाला. यातून उत्पादन खर्चदेखील फिटणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्याची ससेहोलपट चालविली आहे. त्यामुळे आगामी काळात कांदा लागवड करावी
की नाही या विवंचनेत
शेतकरी आहे.नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाळीत कांदा पडून आहे. उन्हाळ कांद्याच्या एकूण उत्पन्नाच्या ६० टक्के कांदा चाळीत पडून आहे. खराब वातावरणामुळे २०टक्के कांदा खराब झाल्याचे गृहीत धरले
तरीही ४० टक्के उन्हाळ कांदा मार्केटला येणे बाकी आहे. अशा परिस्थितीत मोकळ्या कांद्याचा लिलाव सुरु झाला आहे. परंतु भाव गडगडल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहे. (वार्ताहर)

Web Title: Onion prices have collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.