शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात सातत्याने घसरण, शेतकऱ्यांचे जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:45 IST

लाल आणि उन्हाळा कांद्याचे बाजार भाव दररोज कोसळत आहेत.  त्यामुळे सोमवारी लासलगाव येथे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातील जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले.

शेखर देसाई

लासलगाव : सध्या लाल आणि उन्हाळा कांद्याचे बाजार भाव दररोज कोसळत आहेत.  त्यामुळे सोमवारी लासलगाव येथे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातील जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कांदा भावात घसरण होत असून सोमवारी सकाळी निवृत्ती न्याहारकर, गोरख संत, केदार नवले, गणेश निंबाळकर, केशवराव जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी नऊ वाजेच्या दरम्यान आंदोलनाचा पवित्रा घेतला. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजार भाव  घसरत आहेत. कांदा उत्पादकांना कांद्याचा खर्च परवडत नाही.  कमी दराने कांदा विक्री होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध संघटनेच्या नेत्यांनी एकत्रित येऊन गनिमी कावा पद्धतीने आज सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर अचानक जलकुंभावर चढून आंदोलन सुरुवात केले.  त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.

लासलगाव येथील पोलिसांनी धाव घेत आंदोलकांशी चर्चा सुरू केली. लासलगाव बाजार समितीत आज सकाळी २५१ वाहनातील कांदा लिलाव ८००  ते २२०१ सरासरी  १७००रुपये भावाने लिलाव झाला.  आंदोलनामुळे लिलाव बंद झाले. दरम्यान, विधानसभेमध्ये कांदा उत्पादकांचा प्रश्न  मांडून कांदा उत्पादकांच्या व्यथा सरकारसमोर आणतो असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगनराव भुजबळ यांनी दिल्याने आंदोलकांनी  आपले आंदोलन मागे घेतले आहे.

टॅग्स :onionकांदा