कांद्याला १६०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:28 IST2017-10-04T22:28:42+5:302017-10-04T22:28:48+5:30
लासलगाव : तीन दिवसांच्या सुटीनंतर ंयेथील बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले. आज उन्हाळ कांद्याला सरासरी १६१० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. शुक्रवारी कांद्याला सरासरी १४३० रुपये असा भाव मिळाला होता. आज कांद्याच्या दरांमध्ये १६० रु पयाची वाढ झाली.

कांद्याला १६०० रुपये भाव
लासलगाव : तीन दिवसांच्या सुटीनंतर ंयेथील बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले. आज उन्हाळ कांद्याला सरासरी १६१० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. शुक्रवारी कांद्याला सरासरी १४३० रुपये असा भाव मिळाला होता. आज कांद्याच्या दरांमध्ये १६० रु पयाची वाढ झाली.
तीन दिवसांनंतर आज उन्हाळ कांद्याची ६०० ट्रॅक्टर व पिकअप आवक झाली. बाजारभाव रुपये प्रतिक्विंटल कमीत कमी ७०० तर सरासरी १६२०, जास्तीत जास्त १८२६ प्रतिक्विंटल होते. पावसामुळे कर्नाटकमधील नवीन कांदा खराब झाल्यामुळे इतर राज्यात जाणार कर्नाटकचा कांदा कमी झाल्याने लासलगाव कांदा बाजार समितीतील कांद्याला मागणी वाढली आहे. भावदेखील वाढल्याचे आज दिसत आहे. पावसाने गुजरातमधील कांदा खराब झाला आहे. मध्य प्रदेश राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे मध्य प्रदेशातून या कालावधीमध्ये इतर राज्यात जाणारा कांदा रवाना झाला नाही.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारावर बुधवारपासून दिवसभर कांदा लिलाव होणार आहे.
आठवड्याच्या प्रत्येक सोमवार, बुधवार व शनिवार या तिन्ही दिवशी दिवसभर कांदा लिलाव होणार आहे तसेच शेतकरी बांधवांनी आपली चुकवतीची रक्कम आपल्या बँक खात्यावर मिळणेसाठी मालविक्रीस येताना राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची व आधार कार्डची झेरॉक्स प्रत बरोबर आणावी, असे आवाहनही बाजार समिती सूत्रांनी केले.प्रत्यक्ष तेजीचा कमी उत्पादकांना लाभकांद्याच्या भावात तेजी दिसत असली तरी गेल्या सहा-सात महिन्यांपासून साठवणूक केलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहे. पाच-सहा महिन्यापासून साठवलेल्या कांद्याचे वजन कमी होते. तसेच साठवणुकीमुळे खराब होणाºया कांद्याला चाळी बाहेर फेकले जाते. त्यामुळे कांद्याच्या भावात तेजी आली तरी प्रत्यक्ष या तेजीचा फारच कमी लाभ कांदा उत्पादकांना होणार आहे.