कांदा व्यापारी सोनीच्या पोलीस कोठडीत वाढ
By Admin | Updated: July 19, 2014 21:12 IST2014-07-18T23:11:23+5:302014-07-19T21:12:49+5:30
कांदा व्यापारी सोनीच्या पोलीस कोठडीत वाढ

कांदा व्यापारी सोनीच्या पोलीस कोठडीत वाढ
लासलगाव : येथील बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी राधेश्याम खुशालचंद सोनी यास निफाड न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस. व्ही. मडके यांनी येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २३२ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतीमालाचे ३८ लाख ६३ हजार १७५ रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी व्यापारी राधेश्याम सोनी यास लासलगाव पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला शुुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यास आज
निफाड न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस. व्ही. मडके यांच्या समोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सोनी याच्या कोठडीत १८ जुलैपर्यंत वाढ केली. दरम्यान, पोलिसांनी व्यापारी राधेश्याम सोनी याच्याकडून चार बनावट जमा पावती पुस्तके व पेड नावाचे शिक्के जप्त केले आहेत. पोलीस तपासात शेतकऱ्यांच्या फसवणूकप्रकरणात कांदा व्यापारी सतीश रामभाऊ वैराळ व गुलाम शेख यांची नावे उघडक झाली आहेत. दोन -तीन दिवसांपासून सतीश वैराळ व गुलाम शेख हे गायब असून पोलीस त्यांचा शेध घेत आहेत. असे लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)