येवल्यात कांदा आवकेत घट, बाजारभावात घसरण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:59+5:302021-09-06T04:18:59+5:30
इतर राज्यांमध्ये उपलब्ध झालेला कांदा तसेच कांदा निर्यात खुली असली तरी पाकिस्तान, अफगाणिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध ...

येवल्यात कांदा आवकेत घट, बाजारभावात घसरण सुरूच
इतर राज्यांमध्ये उपलब्ध झालेला कांदा तसेच कांदा निर्यात खुली असली तरी पाकिस्तान, अफगाणिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले.
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आदी राज्यांत व परदेशात मागणी सर्वसाधारण होती.
सप्ताहात एकूण कांदा आवक ३९ हजार १४५ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १७३९, तर सरासरी १३५० रुपये प्रती क्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकूण आवक १९ हजार १४३ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १६४३ तर सरासरी १३०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत होते.
इन्फो
टोमॅटाे दरात घसरण
येवला बाजार समिती मुख्य आवारावर टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली, तर बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. टोमॅटोस देशांतर्गत पंजाब, इंदौर, जयपूर, भोपाळ, भुवनेश्वर व दिल्ली आदी ठिकाणी मागणी सर्वसाधारण राहिली. सप्ताहात टोमॅटोची एकूण आवक ५० हजार क्रेटस् झाली असून, बाजारभाव किमान ४० ते कमाल १३०, तर सरासरी ७० प्रती क्रेटस् प्रमाणे होते.