कांदा निर्यात तात्काळ उठवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 03:46 PM2020-09-25T15:46:22+5:302020-09-25T15:47:10+5:30

सायखेडा : निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी आपण केंद्र सरकारला विचारणा करु न निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यपाल यांनी दिली.

Onion exports should be raised immediately | कांदा निर्यात तात्काळ उठवावी

राज्यपाल भगतसिह कोशारी यांची कांदा प्रश्न भेट घेतांना हंसराज वडघुले, योगेश रायते, नाना बच्छाव व इतर.

Next
ठळक मुद्देराज्यपाल भगतसिह कोशारी यांना निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे साकडे

सायखेडा : निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी आपण केंद्र सरकारला विचारणा करु न निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यपाल यांनी दिली.
प्रत्येक वेळा शासनातील लोकं सोईनुसार धोरण राबवतात. केंद्र सरकार एकीकडे जीवनाश्यक वस्तूंबाबत कायदा करते, मग दुसरीकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय का करत आहे. असा सवाल शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी राज्यपाल यांच्याकडे केला.
करोना लॉकडाऊन काळात शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. कांदाप्रश्नी शेतकºयांच्या हितासाठी निर्यात बंदी निर्णय मागे घेणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांत झालेले शेतकºयांचे झालेले नुकसान भरून द्यावे, कारण उत्पादन खर्च पण मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे.
शेतकरी विधेयकात शिवार खरेदी करताना शेतकºयाला आर्थिक संरक्षणाची तसेच किमान आधारभूत किमतीछान कायद्यांत अंतर्भाव व्हावा. निर्यात बंदी रद्द झाली पाहिजे शेतकरी विधेयकात शेतकºयाला संरक्षण न मिळाल्यास महाराष्ट्रभर शेतकºयांचे जनआंदोलन हाती घेण्यात येईल असे आवाहन वडघुले यांनी केले.
यावेळी राज्यपाल भगतिसंह कोशियारी यांनी शेतकरी मी शेतकºयांचा मुलगा असून शेतकºयांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी किटबद्ध राहील केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करेल अशी भावनिक साद शिष्टमंडळाला दिली.
यावेळी शिष्टमंडळात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव, योगेश रायते, राम निकम, मनोज भारती, दीपक भदाणे, विनायक पवार, विद्या वेखंडे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Onion exports should be raised immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.