शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातबंदीचा सत्ताधाऱ्यांना फटका ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कांद्याचे खुल्या बाजारात दर वाढल्याने केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी व व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध ...

ठळक मुद्देशेतकरी आक्रमक : व्यापाऱ्यांचीही नाराजी, समाज माध्यमातून रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कांद्याचे खुल्या बाजारात दर वाढल्याने केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी व व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर निर्बंध आणून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी, सरकारच्या या निर्णयाने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकºयांकडून सोशल माध्यमावर व्यक्त केलेल्या भावना पाहता, त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याकांदा निर्यातब्शेतकरी आक्रमक : व्यापाºयांचीही नाराजी, समाज माध्यमातून रोषांदीचा सत्ताधाºयांना फटका ?ची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुका लक्षात घेता खुद्द सत्ताधारी पक्षाच्या खासदार, आमदारांनीदेखील सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.नाशिक कांदा पिकविणारा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जात असून, देशपातळीवर कांद्याची वाढलेली मागणी व त्यामानाने होणाºया अपुºया पुरवठ्यामुळे गेल्या महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकºयांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे. खुल्या बाजारात कांद्याने ५० ते ७० रुपये किलोपर्यंत उसळी मारल्यामुळे ग्राहकांकडून ओरड होऊ लागताच, महाराष्टÑ व हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी जाहीर करून कांद्याचे भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसेच व्यापाºयांनाही कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लादून कृत्रिम टंचाई निर्माण करून कांद्याची संभाव्य दरवाढ टाळली. सरकारने सदरचा निर्णय कांदा उत्पादक शेतकºयांपेक्षा कांदा खाणाºया ग्राहक हिताचा विचार करून घेतल्याचे मानले जात असले तरी, ग्राहकांना खूश करण्याच्या नादात कांदा पिकविणाºया शेतकºयांचा सरकारने रोष ओढवून घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकºयांनी ठिकठिकाणी लिलाव बंद पाडून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविला आहे.सरकारच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकºयांचे नुकसान होणार असून, त्यामुळे रोष निर्माण झाला आहे. रस्त्यावर उतरून शेतकरी आंदोलन करीत असताना दुसरीकडे त्यांनी सोशल माध्यमातूनही सरकारच्या विरोधात प्रचाराला सुरुवात केली आहे. एकीकडे सरकारच्या विरोधात शेतकरी भावना व्यक्त करीत असताना दुसरीकडे सरकारच्या निर्णयाने शेतकºयांनी घाबरून न जाता आपला कांदा किमान आठवडाभर बाजारात आणू नये, असे आवाहनही केले जात आहे. उमेदवारांनाही भरली धडकीदोन दिवसांपासून सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध पाहता त्याचा निवडणुकीत फटका बसण्याची भीती सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांमध्ये व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने थेट केंद्र सरकारला पत्र लिहून सदरचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे तर सरकारच्या या निर्णयाने निवडणुकीला सामोरे जाऊ पाहणाºया उमेदवारांनाही धडकी भरली आहे.

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019onionकांदा