कांदा, ठेचा, ज्वारी-बाजरीची भाकरी!
By Admin | Updated: September 24, 2016 23:31 IST2016-09-24T23:30:53+5:302016-09-24T23:31:23+5:30
अल्पोपाहार : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचा उपक्रम

कांदा, ठेचा, ज्वारी-बाजरीची भाकरी!
दिंडोरी : मराठा क्र ांती मूक मोर्चासाठी जिल्हाभरातून आलेल्या समाजबांधवांसाठी अल्पोपाहार देण्यासाठी अनेकांनी सेवा बजावली. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी अल्पोपाहारासाठी खास सोलापूरहून ज्वारी-बाजरीच्या सहा महिने टिकणाऱ्या ज्वारी, बाजरीच्या भाकरी, मिरचीचा ठेचा, कांदा, शेंगदाणा चटणी , मसालेदार पुरीभाजी या अस्सल ग्राम ढंगातील पदार्थांची मेजवानी दिली.
अल्पोपाहारास विक्रमी प्रतिसाद लाभला. सकाळपासून ५ लाख लोकांनी लाभ घेतल्याचे सांगण्यात आले. या स्टॉलला खासदार हेमंत गोडसे यांनी भेट दिली़ त्यांनी स्वत: तिथे ३ तास थांबून मराठा बांधवांना अस्सल जेवण वाढून देण्यासाठी स्वयंसेवा केली. यावेळी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.(वार्ताहर)