कांदा चाळ अनुदान प्रलंबित
By Admin | Updated: November 17, 2016 23:13 IST2016-11-17T23:13:25+5:302016-11-17T23:13:17+5:30
कांदा चाळ अनुदान प्रलंबित

कांदा चाळ अनुदान प्रलंबित
कळवण : कळवण तालुक्यातील सन २०१४-१५ मधील प्रलंबित कांदा चाळ अनुदान त्वरित मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बंडू पगार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांना याबाबत निवेदन दिले आहे.
कृषी खात्यामार्फत सन २०१४-१५ या काळात कांदा चाळीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. शासनाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांनी कळवण तालुका कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी १८८ प्रकरणे प्रलंबित असून, यासाठी शासनाने तत्काळ अनुदान रक्कम मंजूर करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)