शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावला बुधवारपासून कांद्याचे पैसे रोखीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 01:04 IST

लासलगाव येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांद्याची विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार, दि. १३ पासून वजनमापानंतर आडत दुकानातच हिशेबपावती तयार करून रोखीने रक्कम देण्याचा निर्णय बाजार समिती व व्यापाºयांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देसंयुक्त बैठकीत निर्णय : केंद्र सरकारच्या नवीन अध्यादेशामुळे केला बदल

लासलगाव : येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांद्याची विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार, दि. १३ पासून वजनमापानंतर आडत दुकानातच हिशेबपावती तयार करून रोखीने रक्कम देण्याचा निर्णय बाजार समिती व व्यापाºयांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.४ सप्टेंबरपासून शेतकºयांना शेतमालाचे पैसे एनईएफटीद्वारे देण्याचा निर्णय झाला होता. मात्र शेतकºयांना यामध्ये अडचणी येत असल्याने बाजार समितीने केंद्राशी संपर्क केला होता. यामुळे केंद्र शासनाने दि. २० सप्टेंबरपासून व्यापाºयांनी शेतकºयांना शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात देण्यासाठी बँकेतून काढल्यास त्यावर २ टक्के उद्गमकर (टीडीएस) लागणार नसल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामुळे शुक्र वार, दि. ८ रोजी बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापारी यांची संयुक्त बैठक होऊन लासलगाव मुख्य बाजार आवारावर कांदा विक्री करणाºया शेतकºयांना त्यांची रक्कम बुधवार, दि. १३ पासून दुकानातच रोख स्वरूपात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीस बाजार समितीचे सदस्य नंदकुमार डागा, जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, कांदा व्यापारी नितीनकुमार जैन, मनोज रेदासनी, प्रफुल्लकुमार भंडारी, हेमंत राका, ओमप्रकाश डागा, लक्ष्मण जगताप, राजमल मुनोत, अनिल आबड, सूर्यकांत बोडके, विलास देवरे, अनिल बांगर, राजेश माठा, नाना सूर्यवंशी, रोशन माठा, संदीप गोमासे, सागर थोरात, सहा. सचिव सुदीन टर्ले, अशोक गायकवाड, पंकज होळकर, दिलीप देसाई यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदाbusinessव्यवसायMONEYपैसा