सटाणा बाजार समितीत कांदा तेजीत

By Admin | Updated: June 27, 2014 00:15 IST2014-06-26T21:47:46+5:302014-06-27T00:15:16+5:30

सटाणा बाजार समितीत कांदा तेजीत

Onion boosts in Satana market committee | सटाणा बाजार समितीत कांदा तेजीत

सटाणा बाजार समितीत कांदा तेजीत

 

सटाणा : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या तीन दिवसांपासून विक्रीसाठी आलेल्या उन्हाळी कांद्याने सलग विक्रमी भाव घेतला असून, आज सकाळी बाजार समितीमध्ये सुमारे २२५० रु. क्विंंटल भाव मिळाला असल्याची माहिती सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक निकम यांनी दिली.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवार, बुधवार व गुरुवार या तीन दिवसांपासून उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल होऊ लागला आहे. या तीन दिवसात दररोज कांद्याच्या भावात विक्रमी वाढ होत असून, १८०० रुपये, १९५० रुपये तर आज तब्बल २२५० इतका विक्रमी भाव उन्हाळी कांद्याला मिळाला. दरम्यान, आज बाजार समिती आवारात कांदा विक्रीसाठी सुमारे एक हजारांहून अधिक वाहने आल्याने बाजार समिती परिसर गजबजून गेला होता. कांद्याला सलग तीन दिवसांपासून चढता भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गातदेखील उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Web Title: Onion boosts in Satana market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.