सायखेडा उपबाजारात कांदा लिलाव पाडले बंद
By Admin | Updated: July 26, 2016 22:34 IST2016-07-26T22:34:29+5:302016-07-26T22:34:29+5:30
सायखेडा उपबाजारात कांदा लिलाव पाडले बंद

सायखेडा उपबाजारात कांदा लिलाव पाडले बंद
निफाड : कांदा लिलावासाठी आणताना गोणीत भरून आणावा या व्यापारी वर्गाने घेतलेल्या निर्णयास विरोध करून मंगळवारी कांदा उत्पादकांनी सायखेडा उपबाजार आवारातील लिलाव बंद पाडले.
सायखेडा उपबाजारात सात वाहनांमधून १७१ गोण्यात कांदा भरून काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. व्यापारी या लिलावासाठी हजर होते. पहिल्या गोणीतील कांद्याचा लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांनी लिलावास विरोध करून जुन्याच खुल्या पद्धतीने लिलाव करावा, असा आग्रह धरला. मात्र व्यापारीवर्गाने लिलावास नकार दिला. त्यामुळे कांदा लिलाव थांबविण्यात आला. शेतकऱ्यांनी बाजार समितीचे व्यावस्थापक बाजारे यांना निवेदन दिले.
गोणी कांदा विक्री शेतकऱ्यांना परवड नाही. व्यापारीवर्गाने खुला कांदाच खरेदी करावा अशी मागणी केली. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उपबाजारात कांद्याचे लिलाव होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर करण्यात आली.
यावेळी मधुकर सातपुते, परशराम टर्ले, उत्तम खालकर, लक्क्ष्मण बागल, संतू हांडगे, किसन टर्ले, नवनाथ पवार, शिवनाथ ढोकळे, रामचंद्र कुटे, बाबूराव उगले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)