शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

लासलगावी आता अमावास्येलाही कांदा लिलाव सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:06 IST

लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून अमावास्येला बंद असलेल्या कांदा लिलावाबरोबरच प्रत्येक शनिवारी दिवसभर लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय मर्चण्ट‌्स असोसिएशनच्या सभासदांनी घेतला असल्याची माहिती दि लासलगाव मर्चण्ट‌्स असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे व्यापारी सदस्य नंदकुमार डागा यांनी दिली.

ठळक मुद्देमर्चण्ट‌्स‌ असोसिएशनचा निर्णय

लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून अमावास्येला बंद असलेल्या कांदा लिलावाबरोबरच प्रत्येक शनिवारी दिवसभर लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय मर्चण्ट‌्स असोसिएशनच्या सभासदांनी घेतला असल्याची माहिती दि लासलगाव मर्चण्ट‌्स असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे व्यापारी सदस्य नंदकुमार डागा यांनी दिली.

सध्या बाजार समितीच्या बाजार आवारांवर उन्हाळ (रब्बी) कांदा विक्रीस येत आहे. पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची आवश्यकता असल्याने अनेक शेतकरी बांधव त्यांच्याकडील कांद्याची विक्री करण्यासाठी घाई करीत आहे. परंतु गेल्या महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार बाजार समितीतील कांदा लिलाव साधारणतः २४ दिवस बंद होते. त्यामुळे शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन परिसरातील शेतकरी बांधवांबरोबरच लासलगाव बाजार समितीच्या गेल्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून लासलगाव मर्चण्ट‌्स असोसिएशनच्या सभासदांनी अनेक दिवसांची परंपरा मोडीत काढीत येत्या अमावास्येपासून प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात व प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून त्या दिवशी विक्रीस आणावा, असे आवाहन डागा यांनी केले आहे.लासलगाव मर्चण्ट‌्स असोसिएशनतर्फे सत्कारऐन पावसाळी हंगामात सोमवारी (दि.७) बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर ४९० ट्रॅक्टर व १,४४७ पिकअप अशा एकूण १,९३७ वाहनांमधून विक्रीस आलेल्या ३८ हजार २९६ क्विंटल कांद्याची लिलाव प्रक्रिया कमीत कमी वेळात पूर्ण केल्याबद्दल मंगळवारी (दि.८) लासलगाव मर्चण्ट‌्स असोसिएशनतर्फे सर्वात जास्त कांदा खरेदी करणारे खरेदीदार ओमप्रकाश राका, दत्तात्रय खाडे, सौरभ जैन, अनिल बांगर, रोशन माठा यांच्यासह बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, बाजार समितीचे सुनील डचके, दत्तात्रय होळकर, कांतिलाल आंधळे, चांगदेव देवढे, सचिन जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, अभय ब्रह्मेचा, नितीनकुमार जैन, मनोज शिंगी, डॉ.अविनाश पाटील यांच्यासह कांदा व्यापारी मनोज जैन, बाळासाहेब दराडे, प्रवीण कदम, प्रफुल्लकुमार भंडारी, संतोष माठा, राहुल बरडिया, सुरेश खुर्दे, संदीप गोमासे, मनीष सारस्वत, शंकर काळे, भास्कर डोखळे, नाना कोकणे, बाजार समितीचे प्रकाश कुमावत, सुशील वाढवणे, संदीप निकम, मनोज शेजवळ, गौरव निकम, वैभव वाघचौरे, गोरख विसे, रामदास गायकवाड, गणेश आहेर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड