शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कांदा लिलाव बंद; कोट्यवधीची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:28 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच मार्च एण्डच्या कामामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत शुक्रवारपासून (दि.२७) लिलाव बंद झाल्याने,  दररोज किमान दोन तर तीन करोड रुपयांचे व्यवहार   ठप्प होणार आहेत. सलग तीन ते चार  दिवस  लिलाव  बंद असल्याने,   करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प  झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी, हमाल, ट्रक चालक-मालक व व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे.

ठळक मुद्देऐन काढणी हंगामात बाजार समित्या बंद

लासलगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच मार्च एण्डच्या कामामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत शुक्रवारपासून (दि.२७) लिलाव बंद झाल्याने,  दररोज किमान दोन तर तीन करोड रुपयांचे व्यवहार   ठप्प होणार आहेत. सलग तीन ते चार  दिवस  लिलाव  बंद असल्याने,   करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प  झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी, हमाल, ट्रक चालक-मालक व व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. धुळवड सणामुळे  लासलगावसह जिल्ह्यातील   सर्व शेतीमालाच्या लिलाव बंद राहिल्याने अर्थकारण ठप्प झाले आहे. सुमारे दीड ते दोन लाख क्विंटल विक्री होणाऱ्या या शेतीमालाचे लिलाव बंद राहिले. त्यामुळे वीस कोटींचा फटका बसला असून, विविध व्यवसाय ठप्प झाले आहेत. सलग लिलाव बंदमुळे केवळ शेतकऱ्यांचेच  नव्हे, तर व्यापारी     हमाल, मापारी, ट्रक मालक,  चालक, मालक व्यावसायिकांच्या दुकानाचे व्यवहार  ठप्प होणार आहेत. लासलगाव  ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागांत जिल्ह्यातून कांदा निर्यात होत असो, एकट्या लासलगाव बाजार समितीत दिवसाला कांद्याची सुमारे ३० ते  ३५ हजार क्विंटल आवक होते, तर पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी, कळवण विविध  बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन एकूण दोन लाख हजार क्विंटल कांदा आवक होते.  मात्र, उद्या व परवा सलग दोन दिवस जिल्ह्यातील कांद्याबरोबरच शेतीमालाचे  लिलाव बंद असल्याने, कांदा पिकासह भाजीपाला याची प्रथमच कोंडी होत आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्चअखेर केले जाणारे ऑडिट, बँकांचे बंद असणारे व्यवहार अशी करणे देत, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दि. ४ एप्रिलपर्यंत व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी या बाजार समित्या ८ ते १० दिवस बंद राहणार आहेत. ऐन कांदा काढणी हंगामात बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार असल्याने, शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यात अडचणी येणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बाजार समिती परिसर बंद, तर पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आले होते. 

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदाFarmerशेतकरी