शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये ४ अपघातात एक युवक ठार, मायलेकीसह दोन महिला जखमी

By अझहर शेख | Updated: October 23, 2023 17:09 IST

आयशरच्या धडकेत मातोरीचा दुचाकीस्वार तरुण किरण संतोष वड (२०) याचा मृत्यू झाला.

नाशिक : भरधाव पिकअप जीप, आयशर, रिक्षा आणि दुचाकीच्या चालकांनी वेगवेगळ्या ठिकाणी बेदरकारपणे वाहने चालवत अपघाताला कारणीभूत ठरल्याच्या घटना घडल्या. यामध्ये मातोरीचा तरुण ठार झाला तर चार महिला जखमी झाल्या आहेत. आयशरच्या धडकेत मातोरीचा दुचाकीस्वार तरुण किरण संतोष वड (२०) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळसह मुंबईनाका, अंबड, पंचवटी पोलिस ठाण्यात वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पेठ रस्त्यावर भरधाव आयशर ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रविवारी (दि. २२) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार किरणला धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. अपघातानंतर आयशर ट्रकचालक घटनास्थळाहून फरार झाला आहे. या गुन्ह्यात फरार ट्रकचालकाविरुद्ध पोलिस शिपाई योगेश पवार (३५) यांनी फिर्यादी होत म्हसरूळ पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या दुर्घटनेत पंचवटी परिसरातील अमृतधाम चौफुलीजवळ भरधाव पिकअपच्या धडकेत महिला प्रवासी आरती विशाल जाधव (४२, रा. पंचवटी) या जखमी झाल्या आहेत. जाधव यांच्या फिर्यादीवरून पिकअप जीप (एमएच २३ एव्ही ५३४०)च्या अज्ञात चालकाविरुद्ध पंचवटी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत उंटवाडी येथील दोंदे पुलाजवळ भरधाव दुचाकीने पादचारी महिला योगिता वसंत दातार (५९, रा. उंटवाडी) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अंबड पोलिस ठाण्यात दुचाकी (एमएच १५, ईव्ही १४५९)च्या अज्ञात स्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुचाकीस्वार मायलेकी बालंबाल बचावल्याभरधाव रिक्षा चालकाने ओव्हरटेक करताना खोडेनगर कॉलनी रस्त्यावर भरधाव रिक्षा (एमएच १५, एफयू ७६८३) चालवत ओव्हरटेक करत ॲक्टिव्हा दुचाकीस्वार महिलांना धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मनीषा कनिलाल पाटील (३५) व अंजली कनिलाल पाटील (१५, दोघीही रा. खोडेनगर) या मायलेकी जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक सुनील बहिरम यांनी फिर्याद देत मुंबईनाका पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरूद्ध मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात