उकळते पाणी पडल्याने एक वर्षीय मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: February 10, 2017 00:21 IST2017-02-10T00:21:39+5:302017-02-10T00:21:53+5:30
उकळते पाणी पडल्याने एक वर्षीय मुलाचा मृत्यू

उकळते पाणी पडल्याने एक वर्षीय मुलाचा मृत्यू
नाशिक : अंगावर उकळते पाणी पडल्याने उपचार सुरू असलेल्या एक वर्षाच्या बालकाचा गुरुवारी (दि़९) सकाळी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ आर्यन मनोज सोनार (१, रा. खुटवडनगर) असे मयत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज सोनार हे काही दिवसांपूर्वी धुळे येथे कुटुंबीयांसह गेले होते़ याठिकाणी आर्यनच्या अंगावर गरम पाणी पडल्याने तो ३० टक्के भाजला होता़ त्या ठिकाणी उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यास सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)