सर्व परवानग्यांसाठी करावी ‘एक खिडकी योजना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:20+5:302021-09-04T04:19:20+5:30
यंदाच्या गणेशोत्सवातील सर्व सार्वजनिक मंडळे ही गोदावरी प्रदूषण रोखणे तसेच हेल्मेट जनजागृतीसाठी पुढाकार घेणार आहेत. याबाबतचा निर्णय सर्व मंडळांच्या ...

सर्व परवानग्यांसाठी करावी ‘एक खिडकी योजना’
यंदाच्या गणेशोत्सवातील सर्व सार्वजनिक मंडळे ही गोदावरी प्रदूषण रोखणे तसेच हेल्मेट जनजागृतीसाठी पुढाकार घेणार आहेत. याबाबतचा निर्णय सर्व मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे घेतला असल्याचे शहर गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गणेशोत्सव कालावधीसाठी दरवर्षीप्रमाणे काही रस्त्यांवर टाकाव्या लागणाऱ्या मंडपांसाठी गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवसांपर्यंत परवानगी मिळावी, सर्व मंडळांना पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीस परवानगी मिळावी, विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त असावा यासह विविध मागण्यांचादेखील या निवेदनात अंतर्भाव करण्यात आला होता. त्यावेळी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, विनायक पांडे, रामसिंह बावरी, हेमंत जगताप, गणेश बर्वे, सत्यम खंडाळे, प्रथमेश गीते, लक्ष्मण धोत्रे, बबलू परदेशी, रोहन पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
०३ गणेशोत्सव