तीन वाहनांच्या विचित्र अपघात एक ठार, दोन जखमी

By Admin | Updated: September 12, 2016 20:35 IST2016-09-12T20:35:09+5:302016-09-12T20:35:09+5:30

तीन वाहनाच्या विचित्र अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील मुंगळा फाट्यावर १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

One of the three vehicles' strange accident, one killed and two injured | तीन वाहनांच्या विचित्र अपघात एक ठार, दोन जखमी

तीन वाहनांच्या विचित्र अपघात एक ठार, दोन जखमी

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मालेगाव, दि. १२ -  एस.टी., कंटेनर व मालवाहतूक अशा तीन वाहनाच्या विचित्र अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील मुंगळा फाट्यावर १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
 
दूध घेऊन जाणारा एमएच १७, ३९८४ क्रमांकाचा राजहंस कंपनीचा ट्रक  मालेगावकडे येत असताना विरूद्ध बाजूने कंटेनर जात होता. दरम्यान एमएच ४० वाय ५३५४ क्रमांकाची बसही भरधाव मालेगावकडे मागून येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या तीन वाहनामध्ये मुंगळा फाट्यानजीक अपघात झाला. यामध्ये राजहंस दूध ट्रक चालक लक्ष्मण तोरे रा. संगमनेर हा जागीच ठार झाला तर या ट्रकमधे बसलेले किनर सुरेश पटोळे रा. संगमनेर हे जखमी झाले 
 
बसमधील वंदना अनिल कुरवाडे रा. सोनाटी यांच्या पायला जबर मार लागला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारि आणि शिवसेना रुग्ण वाहिकाचे किरण चांगाडे, सुरेश झोंबड़े, मुख़्तार भाई आणि गावकºयांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे नेले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना अकोला हलविण्यात आले.

Web Title: One of the three vehicles' strange accident, one killed and two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.