गुन्हेगारांकडून एकावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:15+5:302021-02-13T04:15:15+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललीत कदम ऊर्फ चण्या, प्रशिक आढांगळे व देवेंद्र पोळ ऊर्फ घुम्या (रा. सर्व सिडको) हल्ला ...

गुन्हेगारांकडून एकावर चाकूहल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललीत कदम ऊर्फ चण्या, प्रशिक आढांगळे व देवेंद्र पोळ ऊर्फ घुम्या (रा. सर्व सिडको) हल्ला करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. त्यातील चण्या कदम आणि प्रशिक आढांगळे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी किरण खंडू देवरे (२७, रा. मोती चौक, दत्त मंदिरजवळ) या युवकाने तक्रार दिली. किरण देवरे बुधवारी (दि. १०) सावतानगर येथील क्रॉम्पटन हॉल भागातून घराकडे जात असताना संशयितांनी त्याला गाठून मागील भांडणाची कुरापत काढून त्यास शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर, ललीत कदम आणि प्रशिक आढांगळे यांनी जीवे मारण्याची धमकी देत हातातील धारदार चाकूने डोक्यावर, डाव्या बरगडीवर वार करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.