वडाळ्यातील घरात घुसून टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:12 IST2020-12-26T04:12:50+5:302020-12-26T04:12:50+5:30
नाशिक : वडाळागावातील म्हाडा इमारतीच्या मागील भागातील घरात घुसून १५ ते २० जणांच्या टोळक्याने पूर्व वैमनस्यातून एकाला बेदम मारहाण ...

वडाळ्यातील घरात घुसून टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण
नाशिक : वडाळागावातील म्हाडा इमारतीच्या मागील भागातील घरात घुसून १५ ते २० जणांच्या टोळक्याने पूर्व वैमनस्यातून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मारहाण झालेल्या व्यक्तीची पत्नी नसरीन गयाउद्दिन शेख (२७) हिने या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार जुनैद, डीएस व सोन्या (अरदाज) या तिघांसह अन्य १५ ते २० जणांच्या टळक्याने नसरीन शेख बुधवारी (दि.२३) यांच्या घरात घुसून तिच्या पतीला बेदम मारहाण केली. नसरीनचा पती नाशिकरोड कारागृहात असताना त्यांचाशी हल्लेखोरांसोबत भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्यासाठीच जुनैद, डीएस व सोन्या (अरदाज) या तिघांनी १५ ते २० जणांच्या टोळक्यासह नसरीन शेख यांच्या घरात घुसून घरातील आरसा, कपाटासह इतर साहित्याची तोडफोड केली. तसेच फरहान उर्फ दहिशा याने त्याच्या मोबाइलवरून नसरीनला फोन करून भांडण मिटविले नाही तर महागात पडेल अशी धमकीही दिल्याची फिर्याद नसरीनने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली असून, त्यावरून हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.