तडीपार गुंडासह एकाचा खून
By Admin | Updated: January 8, 2016 23:48 IST2016-01-08T23:38:43+5:302016-01-08T23:48:32+5:30
गुन्हेगारी पार्श्वभूमी : तोरंगण घाटात मृतदेह

तडीपार गुंडासह एकाचा खून
नाशिक : त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील तोरंगण घाटातील दरीत शुक्रवारी (दि़ ८) सकाळच्या सुमारास शहरातून तडीपार करण्यात आलेला अर्जुन महेश आव्हाड (२६, रा़सातपूर कॉलनी, अशोकनगर, सातपूर) व त्याचा मित्र निखिल विलास गवळी (२३, गोपालनगर, अमृतधाम, नाशिक) या दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले़ या दोघांचा खून करून त्यांचे मृतदेह दरीत फेकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, (पान ७ वर)
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
त्र्यंबक-जव्हार रोडवरील तोरंगण शिवारात घाण्याच्या ओहळ दरीमध्ये दोन युवकांचे मृतदेह असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. एस़ मेहेर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असता दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले़ या मृतदेहावरील कपड्यांची तपासणी केली असता त्यापैकी एकाच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून तो सातपूर कॉलनीतील अर्जुन आव्हाड असल्याचे समोर आले़
मयत आव्हाडचा मृतदेहाच्या डोक्यावरील केस निघालेले, मान, छाती व पोटावर लालसर काळपट निशाण्या तसेच संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत होता़ पोलिसांनी त्याचे काका किरण आव्हाड यांना घटनास्थळी नेऊन मृतदेह दाखविल्यानंतर त्याची ओळख पटली़ तर दुसऱ्या कुजलेल्या मृतदेहाच्या डाव्या हातावर निखिल हे इंग्रजीत गोंदलेले नाव होते़ अमृतधाममधील त्याचा भाऊ पंकज या गोंदलेल्या नावावरून भावाचा मृतदेह ओळखला़
अर्जुन आव्हाड हा ३१ डिसेंबरला घरातून गेला, त्यादिवशी रात्री बारा वाजेपर्यंत त्याचा फोन सुरू असल्याचे त्याचे काका किरण आव्हाड यांनी सांगितले; मात्र त्यानंतर त्याचा फोन लागत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधही घेतला़ या दोघांच्याही मृतदेहाचा पंचनामा करून ते सायंकाळच्या सुमारास शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते़
सातपूर पोलीस ठाण्यात आव्हाडवर, तर आडगाव पोलीस ठाण्यात गवळीवर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या दोघांचा खून टोळीयुद्धातून, आपसी दुष्मनीतून की अन्य कारणासाठी करण्यात आला याचा तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी़आऱपाटील, पोलीस उपनिरीक्षक एसक़े. मेहेर करीत आहेत़ (प्रतिनिधी)
मयत आव्हाड २०१४ पासून तडीपार
सातपूरच्या विश्वासनगरमधील अॅडव्होकेट मेधा जगताप यांचा २१ फेब्रुवारी २०१३ रोजी धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला होता़ या खूनप्रकरणी अर्जुन महेश आव्हाड, चेतन अंबादास सावकार व जितेंद्र राजेंद्र कुलथे यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आव्हाड यास ६ मार्च २०१४ ला तर सावकार व कुलथे या दोघांना ७ एप्रिल २०१४ मध्ये तडीपार केले होते़; मात्र यानंतरही हे तिघे सातपूर परिसरात राहत असल्याची तक्रारही पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती़ मात्र सातपूर पोलिसांना हे कधीही आढळून आले नाही हे विशेष़
मयत निखिल गवळीमयत आव्हाड २०१४ पासून तडीपारसातपूरच्या विश्वासनगरमधील अॅडव्होकेट मेधा जगताप यांचा २१ फेब्रुवारी २०१३ रोजी धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला होता़ या खूनप्रकरणी अर्जुन महेश आव्हाड, चेतन अंबादास सावकार व जितेंद्र राजेंद्र कुलथे यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आव्हाड यास ६ मार्च २०१४ ला तर सावकार व कुलथे या दोघांना ७ एप्रिल २०१४ मध्ये तडीपार केले होते़; मात्र यानंतरही हे तिघे सातपूर परिसरात राहत असल्याची तक्रारही पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती़