एक लाखाचे मोबाइल जप्त
By Admin | Updated: February 25, 2016 23:17 IST2016-02-25T23:16:06+5:302016-02-25T23:17:53+5:30
एक लाखाचे मोबाइल जप्त

एक लाखाचे मोबाइल जप्त
नाशिक : गुप्त माहितीच्या आधारे गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सिटी सेंटर समोर संशयिताच्या मुसक्या आवळल्या. यावेळी संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लाख १५ हजार रुपये किमतीचे महागडे सात मोबाइल मिळून आले.
कार्बननाका येथून सतीश काशिनाथ गांगुर्डे यांना रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयित गुलशन ऊर्फ सुरेशसिंग व त्याच्या साथीदाराने दुचाकीवरून येत लुटल्याची घटना सोमवारी (दि. २२) उघडकीस आली होती. याप्रकरणी गांगुर्डे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप मोंढे, फय्याज सय्यद यांना गुप्त माहितीगाराकडून संशयित गुलशन हा मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. २४) संध्याकाळी गुन्हे शोध पथकाने सापळा रचून संशयितास सिटी सेंटर मॉल समोर पकडले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे एकूण सात मोबाइल संशयित गुलशनकडून हस्तगत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)