मालेगावी पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; आठ फरार

By Admin | Updated: July 15, 2014 00:48 IST2014-07-14T22:43:56+5:302014-07-15T00:48:44+5:30

मालेगावी पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; आठ फरार

One of Malegaon preemptive murders; Eight absconding | मालेगावी पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; आठ फरार

मालेगावी पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; आठ फरार

मालेगाव : शहरातील आझादनगर भागात साठ फुटी रस्त्यावर रियाज मुकादम हॉटेलसमोर कालरात्री दहा ते एक वाजेच्या दरम्यान कुख्यात गुन्हेगार सिराज अहमद हाफीजउल्ला अन्सारी ऊर्फ सिराज भईवा (४०) याचा सशस्त्र मारहाणीत खून करून आठ जण फरार झाले आहेत.
पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत असून, फरार झालेल्यांपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत सिराजची पत्नी फरीदाबानो सिराज अहमद (३६) रा. मीरा दातारनगर हिने आझादनगर पोलिसात फिर्याद दिली. सिराज अहमद हा घरी असताना पंगादादा (पूर्ण नाव माहीत नाही) याने त्यास कामानिमित्त बोलावून नेले. त्यास पूर्ववैमनस्यातून आपल्या साथीदारांबरोबर पंगादादाचे दोन भाऊ अतिक सांड, टिल्ली तसेच दलिया, अबू कबुतर, नसीर हसन, नटवा, अशरफ बोचऱ्या, सावीद मोटवा व इतर तीन-चार जणांनी फरीदाबानो हिचा पती सिराज भईवा याला दारू पाजून त्यांच्या जवळील तलवार, गुप्ती व लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करीत जीवे ठार मारले व पळून गेले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सावीद मोटवा यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय वसावे करीत आहे.

Web Title: One of Malegaon preemptive murders; Eight absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.