शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख रुपये किमतीच्या कांद्याची चोेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 02:01 IST

येथील रहिवासी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून आजच्या कांद्याच्या बाजारभावाप्रमाणे १ लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

कळवण : येथील रहिवासी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून आजच्या कांद्याच्या बाजारभावाप्रमाणे १ लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.याबाबत शेतकरी राहुल पगार  यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी कांद्याचे संरक्षण करण्यासाठी आपला मोर्चा शेतातील कांदा चाळीकडे वळवला आहे.पावसाळ्याच्या सुरवातीस दीड महिना पावसाने दडी मारल्याने व कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पूर स्थितीमुळे पावसाळी लाल कांद्याचे पीक काही ठिकाणी वाया गेले, तर काही ठिकाणी उशिराने आलेल्या पावसामुळे लांबणीवर गेले आहे. त्यामुळे साठवलेल्या उन्हाळी (गावठी) कांद्याचे भाव वाढले आहेत.एक ट्रॉली कांद्याची एक लाखापेक्षा जास्त रकमेची पावती होत असल्याने कळवण तालुक्यातील कांदा चाळीकडे चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे. कळवण येथील शेतकरी राहुल पगार यांचे मोकभणगी शिवारात गट नं ४०३ शेती आहे. या शेतातील चाळीत २२ किलो वजनाचे ११७ प्लॅस्टिक के्रटमध्ये २५ क्विंटल ७४ किलो कांदे होते.याबाबत काहीच तपास नलागल्याने रविवारी (दि. २२) सायंकाळी उशिराने अज्ञात चोरट्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एन. घोडे अधिक तपास करीत आहेत.बाजार समित्यांमध्ये घेतला शोधसध्याच्या दरानुसार म्हणजे ३५०० रु पये याप्रमाणे १ लाख १ हजार ७९० किमतीचा कांदा चोरीला गेला आहे. राहुल पगार व त्यांच्या भावाने कळवण, देवळा, उमराणे, चांदवड, लासलगाव, निफाड, पिंपळगाव, वणी, अभोणा, कनाशी, बिल्लीमोरा सुरत (गुजरात) अशा सर्व बाजार समितीत शोध घेतला आहे.

टॅग्स :theftचोरीonionकांदाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र