नामपूरच्या जिल्हा बँक शाखेतून दीड लाख लंपास

By Admin | Updated: September 12, 2014 00:47 IST2014-09-12T00:47:43+5:302014-09-12T00:47:43+5:30

नामपूरच्या जिल्हा बँक शाखेतून दीड लाख लंपास

One lakh lacs from Nampur district bank branch | नामपूरच्या जिल्हा बँक शाखेतून दीड लाख लंपास

नामपूरच्या जिल्हा बँक शाखेतून दीड लाख लंपास

 

नामपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून अज्ञात भामट्याने खोट्या सह्या करून बिलपुरी येथील एका शेतकऱ्याचे दीड लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
येथील शेतकरी पोपट पवार यांचे झेंडा चौकातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बचत खाते आहे. त्यांनी पाच लाख रुपये आपल्या खात्यात जमा केले होते. त्यातील दीड लाख रुपये अज्ञात भामट्याने खोटी सही करून खात्यातून काढून घेतले. दरम्यान, २७ आॅगस्ट रोजी तोच तरुण सदर खात्यातून ५० हजार रुपये काढण्यासाठी आला होता; परंतु पैसे काढण्याच्या स्लीपवर चुकीचा खाते क्रमांक टाकल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना संशय आला. परंतु त्यावेळी चौकशी करण्याआधीच सदर व्यक्ती बँकेतून पसार झाली.(वार्ताहर)

Web Title: One lakh lacs from Nampur district bank branch