लक्ष्मण बाणाईत यांच्याकडून वाचनालयास एक लाखाची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:15 IST2021-03-23T04:15:45+5:302021-03-23T04:15:45+5:30

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण तुकाराम बाणाईत यांनी त्यांची पत्नी श्रीमती प्रमोदिनी लक्ष्मण बाणाईत यांच्या स्मरणार्थ वाचनालयास ...

One lakh donation to the library from Laxman Banai | लक्ष्मण बाणाईत यांच्याकडून वाचनालयास एक लाखाची देणगी

लक्ष्मण बाणाईत यांच्याकडून वाचनालयास एक लाखाची देणगी

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण तुकाराम बाणाईत यांनी त्यांची पत्नी श्रीमती प्रमोदिनी लक्ष्मण बाणाईत यांच्या स्मरणार्थ वाचनालयास एक लाख रुपये देणगी दिली. वाचनालयासारख्या सांस्कृतिक क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या संस्थेला देणगी दिल्याबद्दल कृतज्ञता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमोदिनी बाणाईत यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीचा वाचनसंस्कृती वाढीसाठी उपयोग केला जाईल, असे वाचनालयाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास अनंत लक्ष्मण बाणाईत यांच्यासह वाचनालयाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष वसंत खैरनार, सहा. सचिव ॲड. भानुदास शौचे, श्रीकांत बेणी, बालविभाग प्रमुख संजय करंजकर, प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे विवेक गरुड, सदानंद जोशी, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, नागेश कांबळे, कृष्णा पवार, मुक्तेश्वर मुन्नशेट्टीवार आदी उपस्थित होते.

फोटो

२२सावाना

Web Title: One lakh donation to the library from Laxman Banai