म्हसरुळला एक लाख ८० लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:13 IST2021-04-05T04:13:56+5:302021-04-05T04:13:56+5:30
पंचवटी : नातेवाइकाच्या दुःखद कार्यक्रमासाठी पुणे येथून आलेल्या महिलेची पर्स खिडकीतून हात टाकून लंपास करत एक लाख ८२ हजार ...

म्हसरुळला एक लाख ८० लाखांची घरफोडी
पंचवटी : नातेवाइकाच्या दुःखद कार्यक्रमासाठी पुणे येथून आलेल्या महिलेची पर्स खिडकीतून हात टाकून लंपास करत
एक लाख ८२ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना काल, शनिवारी रात्री दीड वाजता सुमारास म्हसरुळ शिवारात घडली आहे. याबाबत म्हसरुळ पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घरफोडीप्रकरणी पुणे येथे राहणाऱ्या रूचिरा मयूर जैन यांनी तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी जैन यांच्या
जवळच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने जैन कुटुंबीय दु:खद कार्यक्रमासाठी म्हसरुळ शिवारातील दिंडोरी रोड असलेल्या गीतानगर येथे आलेल्या होत्या.
शनिवारी रात्री गीता लक्ष्मी अपार्टमेंट येथे खोलीत सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने स्लाइडिंग खिडकीतून हात टाकत कशाच्या तरी साहाय्याने बेडरूममध्ये ठेवलेली पर्स चोरून नेली. त्या पर्समध्ये साडेपाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा सुमारे १लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी बेडरूममध्ये ठेवलेली पर्स नसल्याचे निदर्शनास येताच पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.