शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

पेठरोड : दुचाकीवर नियंत्रण सुटल्याने दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 18:18 IST

अपघातात भराडवाडीतील सुनिल बाळू सावंत युवक ठार ठार झाला आहे.

नाशिक :  पेठरोड येथिल तीन पुतळा रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर दुचाकी आढळून झालेल्या अपघातात 18 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत भरधाव दुचकीवरील नियंत्रण सुटल्याने चालक ठार झाल्याची घटना त्र्यंबकनाका सिग्नल येथे घडली.अपघातात भराडवाडीतील सुनिल बाळू सावंत (18) ठार झाला आहे. सावंत व त्याचा चुलत भाऊ सचिन सावंत असे दोघेजण दुचाकीवरून पेठरोड आरटीओकडून फुलेनगर तीन पुतळा रस्त्याने जात असतांना दुचाकी दुभाजकावर धडकली त्यात सुनिल जखमी झाला होता घरी गेल्यावर त्याला उलट्या  होऊ लागल्याने त्याच्या वडिलांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असतांना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. याबाबत हवालदार अरुण गायकवाड तपास करीत आहेत.

भरधाव दुचकीवरील नियंत्रण सुटल्याने चालक ठार झाल्याची घटना त्र्यंबकनाका सिग्नल येथे १० जुन रोजी घडली. त्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू  झाला. योगेश सुरेश पिंगळे (५०, रा. गणेश चौक, नवीन नाशिक) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १० जुनला पिंगळे यांनी आपली दुचाकी एमएच १५, इके ५३२९ या गाडीवरून भरधाव त्र्यंबकनाका सिग्नलवर जिल्हापरिषदेकडे सिग्नल तोडून प्रवेश केला. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी ओम सर्व्हिसेस पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या बॅरेकेटवला धडकली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यूroad safetyरस्ते सुरक्षा