चांदवड : मुंबई आग्रा रोडवर चांदवड रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याला असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ दोन दुचाकींच्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. यातील दुसरी मोटारसायकल टी.व्ही.एस. स्टारचा चालक मोटारसायकल सोडून पळून गेला आहे.सोमवारी ( दि. २१)सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चांदवड येथील पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव तालुक्यातील येसगाव येथून नासिककडे मोटारसायकल (क्रमांक एम.एच. ४१ / ए.आर.४३२९) हिने गौरव रामा सारोटे (२०), राजेंद्र अशोक मोरे (१९) व चेतन अशोक मोरे हे तिघेही ट्रीपलशीट जात असताना. चांदवडजवळ समोरुन येणारी टीव्हीएस स्टार मोटरसायकल पाण्याच्या टाकी जवळून मालेगावकडून येऊन वळण घेत असताना दोन्ही दुचाकींची धडक होऊन त्यात चेतन अशोक मोरे (२२) रा. येसगाव हा ठार झाला. तर राजेंद्र अशोक मोरे व गोैरव रामा सारोटे हे दोघेही जखमी झाले. मृतास व दोन्ही जखमींना सोमा टोल कर्मचाऱ्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास चांदवड पोलीस करीत आहेत.
चांदवडजवळ दुचाकींच्या अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:37 IST
चांदवड : मुंबई आग्रा रोडवर चांदवड रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याला असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ दोन दुचाकींच्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. यातील दुसरी मोटारसायकल टी.व्ही.एस. स्टारचा चालक मोटारसायकल सोडून पळून गेला आहे.
चांदवडजवळ दुचाकींच्या अपघातात एक जण ठार
ठळक मुद्देदोन्ही दुचाकींची धडक होऊन त्यात चेतन अशोक मोरे ठार.