रेल्वेने धडक दिल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:13 IST2021-03-22T04:13:41+5:302021-03-22T04:13:41+5:30

शनिवारी ( दि. २०) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेने एका इसमास उडविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. छिन्नविच्छिन्न अवस्थेत ...

One killed in train collision | रेल्वेने धडक दिल्याने एकाचा मृत्यू

रेल्वेने धडक दिल्याने एकाचा मृत्यू

शनिवारी ( दि. २०) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेने एका इसमास उडविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. छिन्नविच्छिन्न अवस्थेत रेल्वे पटरीवर पोलिसांना हा मृतदेह आढळून आला. जवळपास ५० - ५२ वर्षीय या मृत इसमाचा अंगात सफेद रंगाचा शर्ट, काळ्या मळकट रंगाची पँट असून थोड्या प्रमाणात दाढी वाढलेली आहे. या मृत इसमाची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहे.

घोटी पोलीसांनी याबाबत आकस्मित मृत्यची नोंद केली असून याबाबत घोटी पोलीस पुढील तपास घोटी सहायक निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भास्कर महाले तपास आहे.मृत इसमाबद्दल काही माहिती असल्यास अगर आढळल्यास घोटी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: One killed in train collision