वाहनाच्या धडकेने आडगावला एक ठार
By Admin | Updated: June 12, 2014 01:03 IST2014-06-12T00:51:30+5:302014-06-12T01:03:56+5:30
केदार वस्तीतील जनार्दन शंकर केदार (४८) हे ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वाहनाच्या धडकेने आडगावला एक ठार
पंचवटी : आडगाव शिवारातील मनपा जकात नाक्याजवळ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात केदार वस्तीतील जनार्दन शंकर केदार (४८) हे ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी साडेचार वाजता हा अपघात घडला. पीर मंदिराजवळ राहणारे केदार हे काल जकात नाक्याजवळ असलेल्या केदार ढाब्यावर जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना भरघाव वेगाने जाणाऱ्या गाडीने केदार यांना धडक दिली. त्यात त्यांच्या हातापायाला तसेच डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक टी. ए. चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)