मालसाणे शिवारात अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:18 IST2017-08-12T22:47:40+5:302017-08-13T01:18:40+5:30
मुंबई-आग्रा रोडवर ह्युंदाई कारने पायी चालणाºया पादचाºयास पाठीमागून धडक दिल्याने तो ठार झाल्याची घटना घडली. मालसाणे येथील सुरेश रामभाऊ सोनवणे (५५) हे काम आटोपून सात वाजेच्या सुमारास वडाळीभोईकडून मालसाणे येथील स्वत:च्या घराकडे रस्त्याने जात होते.

मालसाणे शिवारात अपघातात एक ठार
चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर ह्युंदाई कारने पायी चालणाºया पादचाºयास पाठीमागून धडक दिल्याने तो ठार झाल्याची घटना घडली. मालसाणे येथील सुरेश रामभाऊ सोनवणे (५५) हे काम आटोपून सात वाजेच्या सुमारास वडाळीभोईकडून मालसाणे येथील स्वत:च्या घराकडे रस्त्याने जात होते.
याच वेळेस चांदवडकडून नाशिककडे वेगाने ह्युंदाई कार क्रमांक एमएच १५/सी.एम. ८२९३ घेऊन चालक येत होता. मालसाणे गावाजवळील वळण रस्ता पार करताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव असणाºया गाडीने प्रथम रस्त्याच्या कडेने पायी चालणाºया सुरेश सोनवणे यांना धडक दिली. सोनवणे हे उंच उडून गाडीवरील बोनेटजवळील काचेवर आपटले व रस्त्यावर येऊन पडले, तर वेगात असणारी कार रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूस जाऊन उभी राहिली. या धडकेत सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना सोमा कंपनीचे कर्मचारी व पोलीस कर्मचाºयांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या अपघातात वाहनचालक व गाडीतील दोन महिला जखमी झाल्या होत्या; मात्र त्या उपचारासाठी कुठे गर्दीत गेल्या हे समजले नाही. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. मयत सुरेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याबाबत वडाळीभोई पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. साहेबराव कर्डेकर हे तपास करीत आहेत.