खोरी फाट्यावर वाहनाच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:37 IST2020-12-04T04:37:08+5:302020-12-04T04:37:08+5:30

देवळी कराड, ता. कळवण येथील कैलास गुनाजी गांगुर्डे हे दुचाकीवरून वणी-सापुतारा रस्त्याने जात असताना खोरी फाटा ते ...

One killed in a road accident | खोरी फाट्यावर वाहनाच्या धडकेत एक ठार

खोरी फाट्यावर वाहनाच्या धडकेत एक ठार

देवळी कराड, ता. कळवण येथील कैलास गुनाजी गांगुर्डे हे दुचाकीवरून वणी-सापुतारा रस्त्याने जात असताना खोरी फाटा ते चौसाळे फाटादरम्यान राऊत यांच्या शेतजमिनीजवळ आले असता भरधाव एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

खोरी फाटा परिसरात टमाटा खरेदी-विक्री केंद्र असून, सध्या या मार्गावर शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. त्यात या रस्त्याचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात झाल्याने रस्त्याचे काम अंतिम टप्यात आहे, त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यावर भरधाव वाहने चालविण्याची जणू स्पर्धा लागलेली असते. अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

Web Title: One killed in a road accident