शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

टाके घोटीजवळ अपघातात एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 22:58 IST

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील टोलनाक्याजवळील टाके घोटी हद्दीतील सीमा हॉटेलसमोर घोटीवरून मोटारसायकलवरून टाके घोटी येथे घरी जात असतांना सोमवारी (दि.१५) रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान भरधाव असलेल्या कंटेनरने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी झाला आहे.

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील टोलनाक्याजवळील टाके घोटी हद्दीतील सीमा हॉटेलसमोर घोटीवरून मोटारसायकलवरून टाके घोटी येथे घरी जात असतांना सोमवारी (दि.१५) रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान भरधाव असलेल्या कंटेनरने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.मुंबई-आग्रा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून दररोज घोटी-इगतपुरी दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. खंबाळेजवळील अपघातात ४ जण दगावल्याची घटना ताजी असताना सोमवारी या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. सायंकाळी मोटारसायकलवर जाताना कंटेनर (डीडी ०१ सी ९२०५) जोराची धडक दिल्याने या अपघातात प्रदीप चंद्रकांत भगत (१६, रा. टाके घोटी) हा अपघातात ठार झाला तर त्याचा जोडीदार विनायक खंडू भगत (२४, रा. टाके घोटी) हा गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अपघाताची माहिती कळताच खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी त्वरित रुग्णवाहिका चालक नंदू जाधव यांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना घोटी येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले तर दुसरा गंभीर जखमी असल्याने नाशिक येथे हलविण्यात आले.घटनास्थळावरून कंटेनर चालक फरार झाला असून त्याचा शोध इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, मुकेश महिरे हे घेत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू