म्हसरूळला दुचाकी घसरून एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:09+5:302021-07-24T04:11:09+5:30
पंचवटी : दिंडोरी रोडवर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जण ...

म्हसरूळला दुचाकी घसरून एक ठार, एक जखमी
पंचवटी : दिंडोरी रोडवर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात म्हसरूळ गावातील वसंत नामदेव खैरनार (४४) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा नातेवाईक रघुनाथ खैरनार जखमी झाला आहे. रघुनाथ खैरनार ल वसंत खैरनार हे दोघे जण सोमवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच १५ डी ई ५३७९) दिंडोरी रोडने म्हसरूळकडे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी मोराडे जलसेवा केंद्र परिसरातील एका वडाच्या झाडाजवळ घसरली. या अपघातात वसंत खैरनार यांच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी दीपक खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.