दुचाकी स्लिप होऊन एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:17 IST2021-04-30T04:17:32+5:302021-04-30T04:17:32+5:30

मालेगाव : तालुक्यातील करंजगव्हान - कुसुम्बा रस्त्यावर भरधाव वेगात जाणारी दुचाकी स्लिप झाल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण ...

One killed, one injured as bike slips | दुचाकी स्लिप होऊन एक ठार, एक जखमी

दुचाकी स्लिप होऊन एक ठार, एक जखमी

मालेगाव : तालुक्यातील करंजगव्हान - कुसुम्बा रस्त्यावर भरधाव वेगात जाणारी दुचाकी स्लिप झाल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला. वैभव किरण जाधव यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसात या अपघाताची फिर्याद दिली. पोलिसांनी शरद तुळशीराम जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित शरद तुळशीराम जाधव हा बजाज पल्सर दुचाकी क्रमांक (एमएच १५ बीएच ०३७५)वर त्याचा भाऊ किरण तुळशीराम जाधव (५०, रा. करंजगव्हान) याच्यासह कुसुम्बा रोडने मालेगावकडे भरधाव वेगात येत असताना ताबा सुटल्याने दुचाकी स्लिप झाली. या अपघातात पाठीमागे बसलेला किरण जाधव याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन अपघाताची माहिती न देता, पळून गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पवार करत आहेत.

Web Title: One killed, one injured as bike slips