सोमवारी (दि. ६) सकाळी या रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी येवला तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. या वेळी पोलीस हवालदार अरुण गंभीरे, हेबांडे, उंबरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास येवला पोलीस करीत आहेत.
गतिरोधकाची मागणी
दरम्यान, मुखेड देवगाव फाटा रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे गतिरोधक नसून जय मल्हार हॉटेलजवळ असलेल्या चौफुली परिसरात अपघात घडत असतात. मुखेड देवगाव फाटा रस्ता हा नव्याने डांबरीकरण झालेला असल्याने वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर गत काही दिवसांपूर्वीदेखील अपघात घडला असून, अपघातात मुखेड येथील रहिवाशाचा मृत्यू झाला होता. काही अपघातांत गंभीर जखमी होण्याच्यादेखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे मुखेड - देवगाव रस्त्यावर संबंधित विभागाने तत्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे.