नाशिक : द्वारकाकडून उपनगरकडे जात असताना दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा शुक्रवारी (दि़२४) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ गंगाधर तुकाराम गाडेकर (७६) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे़ नाशिक- पुणे मार्गावरील सिटीकेअर हॉस्पिटलसमोर २ डिसेंबर रोजी त्यांची दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटुंबीयांनी त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते़ या अपघाताची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
दुचाकी अपघातात एक ठार
By admin | Updated: March 25, 2017 16:45 IST