वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:26 IST2019-05-06T15:26:29+5:302019-05-06T15:26:36+5:30

वणी : नांदुरी येथुन कळवणकडे जाणाऱ्या मॅक्झीमो कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.

 One killed after losing control of the vehicle | वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक ठार

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक ठार

वणी : नांदुरी येथुन कळवणकडे जाणाऱ्या मॅक्झीमो कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. चिखलीपाडा फाटा परिसरात हा अपघात सोमवारी सकाळी दहा वाजेचे सुमारास घडला. नांदुरी येथुन कळवणकडे जाण्यासाठी वाहन क्र मांक एमएच ०६ बीई ६१९६ या मॅक्झीमो कारमधून सुरेश नारायण भोये, पर्बत बाळु बहीरम, दोघे राहणार दरेगाव तसेचिवष्णु लाडे पंडित पवार गोकुळ भोये पवन साबळे असे गोबापुर व परिसरातील प्रवासी मार्गक्र मण करत होते. चिखलीपाडा फाटा परिसरात पाचशे मीटर अंतरावर सदर कारमधे तांत्रिक बिघाड निर्माण झाला व वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. त्यात सदरचे वाहन उलटे झाल्याने झालेल्या अपघातात सुरेश नारायण भोये यांचा अंत झाला. इतर सहप्रवासी जखमी झाले. नांदूरी येथे त्यांचेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. सुरेश भोये यांचा मुलगा प्रविण भोये हा पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असुन घरची परीस्थिती बेताची असताना सुरेश यांनी मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करु न आर्थिक तरतुद केली होती. मुलगा डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाºया भोये यांना काळाने हिरावुन नेल्याने दरेगाव गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  One killed after losing control of the vehicle