विल्होळीनजीक अपघातात एक ठार
By Admin | Updated: October 24, 2015 23:29 IST2015-10-24T23:28:43+5:302015-10-24T23:29:17+5:30
विल्होळीनजीक अपघातात एक ठार

विल्होळीनजीक अपघातात एक ठार
सिडको : ठाण्याकडून नाशिककडे येणाऱ्या इरटिका कारने विल्होळीनजीक उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने एका कंपनीच्या व्यवस्थापकाचा मृत्यू झाला असून, चालकही गंभीर जखमी झाला आहे.
शिरपूर येथील गोल्डमिल कंपनीचे व्यवस्थापक मोहन शिंदे (५६, रा. कल्याण) हे सकाळी त्यांची इरटिका वाहनाने (एमएच ०५ सीएम ०३६८) चालक प्रशांत चौधरी (२२, रा. कल्याण) यांना बरोबर घेत ठाण्याहून नाशिककडे जात होते. चालक प्रशांत चौधरी यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने इरटिका उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)