वैतरणा रस्त्यावर अपघातात एक ठार
By Admin | Updated: February 8, 2017 00:27 IST2017-02-08T00:27:15+5:302017-02-08T00:27:28+5:30
घोटी : वैतरणा रस्त्यावर दुचाकीला धडक

वैतरणा रस्त्यावर अपघातात एक ठार
घोटी : घोटी-वैतरणा रस्त्यावर वाकी शिवारात कावनईहून घोटीला येणाऱ्या दुचाकीस वैतरणाकडे जाणाऱ्या भरधाव पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनचालक फरार झाला आहे. कावनई येथील नारायण पुंजाजी रायकर (५०) हे कावनई येथून घोटी येथे दुचाकीने (एमएच १५,बीएस ७१७०) दवाखान्यात येत असताना वाकी गावाजवळ एका वळणावर घोटीहून वैतरणाकडे जाणाऱ्या पिकअप वाहनाने (एमएच ४८, टी ४२९०) धडक दिल्याने अपघात होऊन नारायण रायकर जागीच ठार झाले. दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे. पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी, कृष्णा कोकाटे अधिक तपास करीत आहेत.