कसारा घाटातील अपघातात एक ठार
By Admin | Updated: July 3, 2016 23:56 IST2016-07-03T22:54:03+5:302016-07-03T23:56:17+5:30
कसारा घाटातील अपघातात एक ठार

कसारा घाटातील अपघातात एक ठार
इगतपुरी : कसारा घाटात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे निसर्ग बहरला असून मुंबई, नाशिककडून येणारे, जाणारे प्रवासी वाहने थांबवून सेल्फी घेतात. अशाच निसर्गाचे फोटो घेण्यासाठी दुपारी एकच्या दरम्यान स्विफ्ट गाडी क्र मांक एम. एच. १५ बी. सी. ७३१६ ही महामार्गालगत घाटात थांबलेली असताना याच दिशेने मारुती वॅगनर गाडी क्र मांक एम. एच. २० डी. सी. ११०४ ही ओव्हरटेक करत असताना मागून येणारा कंटेनर क्र मांक एम. एच. १५ डी. जे. १११६ चालकाचा ताबा सुटल्याने उभ्या गाडीला जोरदार धडक दिली. यात वॅगनरमधील सुनील एकनाथ पाटील ( ५० ) , राहणार घाटी जिल्हा परभणी हे जागीच ठार झाले, तर वंदना सुनील पाटील (४७), मयूर सुनील पाटील (२४), प्रणाली सुनील पाटील (१८) सर्व राहणार घाटी जिल्हा परभणी हे जखमी झाले आहेत. उभ्या असलेल्या स्विफ्ट गाडीतील रवि रोसलाणी (३९), समनर रोसलाणी (३५), लक्ष्मी आडवाणी (५०), धीरज रोसलाणी (१०), गुंजन रोसलाणी (११) व चालक सागर (पूर्ण नाव समजले नाही ) सर्व राहणार नाशिक हे जखमी झाले आहेत.
यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कसारा पोलिसांनी दिली. या अपघातातील जखमींना घटनास्थळी गॅमन इंडिया एक्स्प्रेस वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीची मदत करून उपचाराकरिता रुग्णालयात पाठविले. अपघातातील सर्व जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून अधिक तपास कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कसबे करीत आहे. (वार्ताहर)