नाशिक -पुणे महामार्गावर सिन्नर तालुक्यात गोंदे शिवारात झालेली अपघात- ग्रस्त पिकअप.सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर गोंदे शिवारात झालेल्या अपघातात माळवाडी येथील एकजण ठार, तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.अपघातात देवराम मुरलीधर कांगणे (५०, रा. माळवाडी, ता. सिन्नर) मयत झाले. याबाबत पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदूरशिंगोटे येथील बंडू राजाराम फड (३१) व त्यांचे सासरे देवराम कांगणे पिकअपने (क्र. एमएच १५ डीके ७२१३) नाशिक मार्केटला कांदा विक्रीसाठी गेले होते.याबाबत बंडू फड यांनी वावी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. के. अढांगळे हे तपास करत आहेत.रात्री उशिरा सिन्नरकडून नांदूरशिंगोटेकडे येत असताना त्यांच्यापुढे संगमनेरकडे जात असलेला अज्ञात हायवा डंपरने रस्त्यावर अचानक ब्रेक लावल्याने पिकअप गाडीचा क्लिनर साइडची डंपरला धडक बसल्याने पिकअपमधील देवराम कांगणे यांना गंभीर मार लागल्याने ते जागीत मृत झाले.
गोंदे शिवारात अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:57 IST
नाशिक - पुणे महामार्गावर गोंदे शिवारात झालेल्या अपघातात माळवाडी येथील एकजण ठार, तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
गोंदे शिवारात अपघातात एक ठार
ठळक मुद्देएक जखमी : डंपरची पिकअपला धडक