वणी अपघातात एक ठार, २६ जखमी

By Admin | Updated: May 17, 2015 23:34 IST2015-05-17T23:24:41+5:302015-05-17T23:34:29+5:30

वणी अपघातात एक ठार, २६ जखमी

One killed, 26 injured in Wani accident | वणी अपघातात एक ठार, २६ जखमी

वणी अपघातात एक ठार, २६ जखमी


वणी : ओव्हरटेक करताना बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक-कळवण ही बस हॅमर कंपनीच्या आइस्क्रीम रेफ्रिजेटेड आयशरवर जाऊन धडकली. या अपघातात व्हॅनचालक जागीच ठार झाला, तर बसमधील २६ प्रवासी जखमी झाले. गवत चाचणी केंद्र परिसरात वणी-दिंडोरी रस्त्यावर हा अपघात रविवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास झाला.
एमएच १४ बीटी-९४३२ ही बस नाशिक येथून कळवणकडे दिंडोरी-वणी रस्त्यावरून येत असताना समोरून हेमर कंपनीची आइस्क्रीम व्हॅन (एमएच ०४ जीएफ-९७२९) अहमदाबाद (गुजरात) येथून नाशिक येथे आइस्क्रीम वाटप करण्यासाठी जात होती. याच सुमारास समोरून भरधाव वेगात बस ओव्हरटेक करीत असल्याचे व्हॅनचालकाने पाहिल्याने आपले वाहन रस्त्याच्या कडेलगत घेतले. मात्र एस.टी. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस आयशरवर धडकल्याने आयशर व्हॅनचालक महंमद रियाज (रा. मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला, तर बसमधील १२ प्रवासी जखमी झाले.
बसमधील रामभाऊ लक्ष्मण चव्हाण, वाहक बी. एस. पवार (दोघे रा. कळवण), चंद्रकला विठ्ठल गायकवाड, प्रकाश अमृत गवळी (शिवाजीनगर), गंगा किसन चौरे (रवळजी, कळवण), लक्ष्मण काशीराम गायकवाड (रा. साकोरा, बागलाण), मंटू रज्जाक (रा. भिवंडी, पाइपलाइन, कल्याणरोड), राहुल जव्हेरी, (पंचवटी, नाशिक), वणी मर्चंट बँकेचे चेअरमन रिकनचंद बाफना, नीळकंठ रंगनाथ राऊत, रामेश्वर वैजनाथ राऊत (दोघे रा. माझलगाव, बीड), रेखा सोमा देशमुख, चंद्रकला गायकवाड (दोघे रा. उंबरेमाळ, सुरगाणा), मंगला प्रकाश गवळी (शिवाजीनगर, नाशिक), (पान २ वर)

योगेश मोतीराम निंबारा (रा. खर्डी, अंबाडा, कसारा), सुनीता विलास पगारे, रोहित विलास पगारे (रा. माळसाकोरा), रामदास चौधरी (रा. विल्होळी, माळेगाव), कला श्रावण महाले, गाती श्रावण महाले (दोघे रा. सायन, मुंबई), शंकर नारायण हटकर, (रा. आमराईनगर, ओम निवास सोसायटी, नाशिक), काशीनाथ सावळीराम बेंडकुळे, कलाबाई काशीनाथ बेंडकुळे, (रा. देवघर दिंडोरी), माधव किसन डंबारे (वनारवाडी, दिंडोरी), वच्छलाबाई माधव डंबाळे (वनारवाडी), अर्जुन बाळू भडांगे (देवपाडा) असे २५ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच टॅक्सीचालक-मालक संघटनेचे सुनील बर्डे, गणेश शेलार, जाधव, विजय बेर्डे, जि. प. सदस्य बाळासाहेब गांगुर्डे, राजेश परदेशी व कार्यकर्त्यांनी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. .....जोड....

Web Title: One killed, 26 injured in Wani accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.