वडबारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:39 IST2019-07-04T00:38:35+5:302019-07-04T00:39:03+5:30
चांदवड : तालुक्यातील वडबारे येथे घराशेजारील पडवीत झोपलेल्या अशोक नामदेव जोरे (५८) यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले.

वडबारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी
ठळक मुद्देजखमी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील वडबारे येथे घराशेजारील पडवीत झोपलेल्या अशोक नामदेव जोरे (५८) यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वडबारे परिसरात पुन्हा बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाचे कर्मचारी सतर्क झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी जखमी जोरे यांची भेट घेऊन विचारपूस केली.