रासबिहारी शाळेचा शंभर टक्के निकाल

By Admin | Updated: June 7, 2016 07:39 IST2016-06-06T22:49:38+5:302016-06-07T07:39:23+5:30

रासबिहारी शाळेचा शंभर टक्के निकाल

One hundred percent result of Rasbihari school | रासबिहारी शाळेचा शंभर टक्के निकाल

रासबिहारी शाळेचा शंभर टक्के निकाल

नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. शाळेतील नऊ विद्यार्थी ९१ ते ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून, २० टक्के विद्यार्थ्यांना ८१ ते ९० टक्के गुण तसेच ४४ टक्के विद्यार्थी ७१ ते ८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याची माहिती मुख्याध्यापक श्रीमती बिंदू विजयकुमार यांनी दिली. शिवानी पानगव्हाणे ही ९४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम, तर तेजस्विनी सावकार आणि रिद्धी बेदमुथा ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. पूर्वा वधवाने ८६ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. रासबिहारी स्कूलमधील आय. जी. एसी. केंब्रीज बोर्डाचा निकाल चांगला लागला आहे. प्रणय करकले व तृप्ती पाटील हे दोघे शाळेत आले आहेत. त्यांना सहा विषयांत ‘ए’ प्लस मिळाला आहे, तर मृण्मयी भावसार ही द्वितीय आली असून, तिला चार विषयांत ‘ए’ स्टार मिळाला आहे.

Web Title: One hundred percent result of Rasbihari school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.