शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नाशिक विभागात दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:46 IST

दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व  जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकांचे संकलनास विलंब झाला असला तरी नाशिक विभागीय मंडळाने विभागातील अन्य भागातून फिजिकल डिस्टन्स कोरोना प्रतिबंधात्मक योग्य ती उपाययोजना करून शंभर टक्के उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देदहावी,बारावीच्या उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्णमालेगावसाठी केले स्वतंत्र नियोजन नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे यश

नाशिक : कोरोनाच्या सावखाली झालेल्या दहावी व बारावी परीक्षांमधील उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून या सर्व उत्तर पत्रिकांची संकलन प्रक्रिया नाशिक विभागीय मंडळाने शंभर टक्के पूर्ण केली आहे.  प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील व  जळगावातील मुक्ताईनगर, भुसावळ भागातील उत्तरपत्रिकांचे संकलनास विलंब झाला असला तरी नाशिक विभागीय मंडळाने विभागातील अन्य भागातून फिजिकल डिस्टन्स कोरोना प्रतिबंधात्मक योग्य ती उपाययोजना करून शंभर टक्के उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण केल्याने आता निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जून अखेर अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनाच्या सावटात बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर दहावीची परीक्षाही अंतिम टप्प्यात आलेली असताना शेवटचा  भुगोलाचा पेपर होण्यापूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला व पुढे देशात कोरोनाचा कहर वाढल्याने हा पेपर रद्द करून अन्य विषयांच्या सरासरी गुणांप्रमाणे निकाल जाहीर करण्याचा निर्णय झाला.  परंतु, कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे आणि त्या पुन्हा संकलित करून निकाल तयार करण्याचे आव्हान मंडळासमोर निर्माण झाले होते. लॉकडाऊनच्या काळात परीक्षक शिक्षकांना व नियामकांना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे पेपरची तपासणी पूर्ण होऊनही ते वेळेत नियमकांपर्यंत पोहोचू शकले नाही. तर नियमकांनाही त्यांना प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिका विभागीय मंडळापर्यंत पोहोचविण्यात अडचणी आल्या. या काळात विभागीय मंडळाने पोलीस व जिल्हा प्रशासनाची विशेष परवानगी घेऊन उत्तर पत्रिका संकलनाचे काम पूर्ण केले.  दहावीचे सुमारे सात हजारहून अधिक परीक्षक व साडेनऊशे नियामकांसह बारावीच्या साडेसहाशे नियामक व सुमारे सहा हजार शिक्षक व विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत सक्रीय योगदान दिल्याने नाशिक विभागातील संपूर्ण उत्तर पत्रिकांचे संकलन पूर्ण होऊ शकले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालHSC / 12th Exam12वी परीक्षा