शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

एकशेवीस एकर जमिनीचा मालक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:34 IST

लासलगाव : माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा कायदा झाला असला तरी आजही संपत्तीच्या मोहापाही रक्ताच्या नात्यांकडून ज्येष्ठांना घरातून हद्दपार करण्याच्या घटना घडत असतात. मात्र, समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण लासलगाव येथील टाकळी विंचुर या गावात समोर आले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात तब्बल एकशे वीस एकर शेतजमिनीचा मालक असलेल्या वयोवृद्धास घरातून काढून दिल्यानंतर टाकळी विंचुर येथील हनुमान मंदिरात वास्तव्यास आलेल्या या वयोवृद्धास तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देत त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली आणि जगण्याचा आधार दिला.

ठळक मुद्देवृद्धाश्रमात दाखल : सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार

शेखर देसाई।लासलगाव : माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा कायदा झाला असला तरी आजही संपत्तीच्या मोहापाही रक्ताच्या नात्यांकडून ज्येष्ठांना घरातून हद्दपार करण्याच्या घटना घडत असतात. मात्र, समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण लासलगाव येथील टाकळी विंचुर या गावात समोर आले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात तब्बल एकशे वीस एकर शेतजमिनीचा मालक असलेल्या वयोवृद्धास घरातून काढून दिल्यानंतर टाकळी विंचुर येथील हनुमान मंदिरात वास्तव्यास आलेल्या या वयोवृद्धास तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देत त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली आणि जगण्याचा आधार दिला.घरातून काढून दिल्यानंतर सैरभैर झालेले हे आजोबा गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव जवळील टाकळी विंचुर येथील हनुमान मंदिरात वास्तव्यास असून ते आजारी होते. पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी याबाबत लासलगावच्या राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संजय बिरार यांना फोन करून एक आजोबा आठ दिवसापासून टाकळीच्या हनुमान मंदिरात आले आहेत, ते चार दिवसांपासून खूप आजारी आहेत, त्यांना वृद्धाश्रमात पाठवता येईल काय, अशी विचारणा केली. लागलीच संजय बिरार यांनी आजोबांची सेंगऋषी वृद्धाश्रमात व्यवस्था करतो, असे सांगितले आणि आश्रमाचे संचालक नवनाथ जराड यांना फोन करत त्यांना आजोबांची माहिती दिली. आश्रमाचे संचालक नवनाथ जराड यांनीही लगेच होकार दिला आणि आजोबांचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर संजय बिरार ,अजय अनवट व विनायक बसरे(दिनू) हे रिक्षा घेऊन आले. त्यांनी आजोबांशी गप्पा मारल्या. सरुवातीला त्यांनी त्यांच्या गावाचे नाव लाखलगाव सांगितले, मात्र परत विचारणा केली त्यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील रहिवाशी असून १२० एकर शेती आहे. मात्र नातेवाईकांनी ती हडपल्याची कर्मकहाणी त्यांनी ऐकवली. त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. अखेर आजोबांना सेंगऋषी वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांकडून आतिथ्यआजोबा गेल्या आठ दिवसांपासून उपाशी होती. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अशक्तपणा होता. उपाशी असलेल्या या आजोबांना टाकळीच्या ग्रामस्थांनी जेऊखाऊ घातले. त्यांच्या आजारावर उपचार करत त्यांना सोबत औषधेही घेऊन दिली. उपचारानंतर आणि वृद्धाश्रमात दाखल केल्यानंतर बाबांच्या चेहºयावर हसू उमटले आणि त्यांनी सर्वांचे आभार मानले.