स्वीमिंग टँकमध्ये शॉक लागून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST2021-06-02T04:12:47+5:302021-06-02T04:12:47+5:30

रविवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान लँमरोड बालगृह येथील मेरूभूमी सोसायटीत स्वीमिंग टँकमध्ये कीर्तिकुमार शहा पोहण्यास गेले. पाण्यात उतरल्यानंतर ...

One dies of shock in swimming tank | स्वीमिंग टँकमध्ये शॉक लागून एकाचा मृत्यू

स्वीमिंग टँकमध्ये शॉक लागून एकाचा मृत्यू

रविवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान लँमरोड बालगृह येथील मेरूभूमी सोसायटीत स्वीमिंग टँकमध्ये कीर्तिकुमार शहा पोहण्यास गेले. पाण्यात उतरल्यानंतर अचानक विद्युत प्रवाह पाण्यात उतरला व शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कीर्तिकुमार शहा साडेसहा वाजेपर्यंत परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आजूबाजूला शोधाशोध केली, मात्र रात्री आठ वाजेदरम्यान कोणीतरी स्वीमिंग टँकमध्ये डोकावले असता शहा पाण्यात पडलेले दिसून आले. याबाबत पोलिसांना तत्काळ कळविण्यात आलेे. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर शहा यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोेषित करण्यात आले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता मेरूभूमी सोसायटीत पंधरापेक्षा जास्त मुले त्याच स्वीमिंग टँकमध्ये पोहत होती. कीर्तिकुमार शहा पोहण्यास गेले तेव्हा विद्युत पुरवठा खंडित होता. अचानक सहा मिनटे विद्युत पुरवठा सुरळीत झाला व पुन्हा खंडित झाला. या काळातच कीर्तिकुमार शहा यांचा शॉक बसून मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. त्यांच्या निधनाने लँमरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो ०१ कीर्ती)

Web Title: One dies of shock in swimming tank